
दाभोळ बंदर धक्का येथे 36 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेले सुलभ शौचालयाची दुरावस्था
दाभोळ बंदर धक्का येथे सार्वजनिक वापरांसाठी 36 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेले सुलभ शौचालय हे पूर्णपणे घाणीने माखले आहे . मेरी टाईम बोर्डाच्या मालकीच्या असलेल्या आणि घाणीने माखलेल्या या स्वच्छतागृहातील स्वच्छता करण्याचे साधे सौजन्यदेखील मेरीटाईम बोर्ड दाखवत नाहीत्यामुळे स्वच्छतागृहातील घाणीच्या दुर्गंधीने डासांची उत्पत्ती वाढून एखाद्या संसर्गजन्य साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव पसरला तर त्याची सारी जबाबदारी मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी घेतील का असा संतप्त सवाल रहिवाशांकडून होत आहे.
दापोली तालुक्यातील ऐतिहासिक बंदर असलेल्या दाभोळ गावातील बंदर धक्का येथे मेरीटाईम बोर्डाने 36 लाख रूपये खर्च करून एक स्वच्छतागृह बांधले आहे. सुलभ शौचालयात पाण्याच्या सोयीसाठी आणखीन 10 लाख रूपये खर्च केले आहेत. अशा तन्हेने तब्बल 46 लाख रूपये खर्च करून उभारलेल्या सुलभ शौचालयाची मेरीटाईम बोर्डाकडून स्वच्छताच केली जात नाही. त्यामुळे स्वच्छतागृहात बाटल्यांचा खच पडला आहे. झाडलोट केली जात नसल्याने स्वच्छतागृहात कमालीची दुर्गंधी येत आहे. त्यामुळे महिलावर्गाला या स्वच्छतागृहाचा वापर करताच येत नाही. त्यामुळे येथून प्रवास करणारे संताप व्यक्त करत आहेत




