
रणजीत पवार यांना राज्यस्तरीय सत्यशोध गुणवंत कर्मचारी पुरस्कार
संगमेश्वर तालुक्यातील जनता विद्यालय, आंगवली विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी रणजीत रवींद्र पवार यांना कामगार नेता नारायण मेघाजी लोखंडे राज्यस्तरीय सत्यशोधक गुणवंत कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंजपेठ (पुणे) येथे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे (RMBKS) नुकत्याच आयोजित केलेल्या सातव्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनात प्रदान करण्यात आला.
रणजीत पवार यांनी शिक्षकेतर सेवेत प्रामाणिकपणे, शिस्तबद्धतेने व जबाबदारीने कार्य करून संस्थेचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. त्यांच्या कार्यतत्परतेची, सामाजिक जाणिवेची आणि निष्ठेची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना रणजीत पवार म्हणाले यांनी हा पुरस्कार आई, गुरूजनांना, सहकाऱ्यांना व संस्थेला समर्पित केल्याचे सांगितले. हे यश मला समाजासाठी अधिक कार्य करण्याची प्रेरणा देते, असे त्यांनी सांगितले. या सन्मानामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा आणि संगमेश्वर तालुक्याचा अभिमान अधिक वाढला आहे.




