
आता इस्लामपूर नाही तर ईश्वरपूर म्हणायचं!
महाराष्ट्रातील काही शहरांचे नामंतर करण्यात आल्याने ती शहरे आता नव्या नाव्याने ओळखू लागली आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामकरण झाले असून, ही शहरे अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या नाव्याने ओळखली जात आहेत.नुकतेच सांगली जिल्ह्यात असलेल्या इस्लामपूर शहराच्या नामंतराला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली होती. आता केंद्रानेही इस्लामपूर शहराच्या नामकरणास हिरवा कंदील दर्शवत मान्यता दिली आहे. आता इस्लामपूर हे शहर ईश्वरपूर या नव्या नावाने ओळखले जाणार आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकारने इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याच्या प्रस्तावाला अखेर मान्यता दिली आहे.



