
रोजगाराच्या शोधात ओडिसा येथून गोव्यात आलेल्या युवकाचा रेल्वेच्या चाकाखाली सापडल्याने मृत्यू
रोजगाराच्या शोधात गोव्यात आलेल्या एका युवकाला रेल्वेच्या चाकाखाली सापडल्याने आपला जीव गमवावा लागला. मडगावच्या कोकण रेल्वेस्थानकावर गुरुवारी (23 ऑक्टोबर) सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करत असताना तो गाडीच्या चाकाखाली आला.
मयत ओडिशा राज्यातील असून, तो ३० वर्षे वयोगटातील आहे, अशी माहिती कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल नाईक यांनी दिली. तो आपल्या मामेभावासमवेत काल बुधवारी गोव्यात आला होता. एका इसमाने त्याला गोव्यात काम देऊ असे सांगितले होते.गोव्यात आल्यानंतर त्या इसमाला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, पलीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हताश होऊन त्या दोघांनी पुन्हा गावी जाण्याचा निर्णय घेतला होता
अमरावती येथे जाणारी शालिमार एक्सप्रेस रेल्वे आली. कुणीतरी ही रेल्वे झारखंड येथे जात असल्याचे सांगितल्याने घाईगडबडीत ती पकडण्याच्या नादात त्या युवकाचा तोल गेला व त्याचे दोन्ही पाय रेल्वेच्या चाकाखाली सापडले त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला




