
रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान
रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून सुरक्षित रित्या बाहेर काढून जीवदान देण्यात आले आहे
रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथील अमि अली अब्दुल हमीद काझी यांचे मालकीच्या आंबा कलम बागेतील कच्चा कठडा असलेल्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना गुरुवारी दि. २३ रोजी दिसून आली.
याबाबतची माहिती वाजण्याच्या सुमारास मजगाव गावचे पोलीस पाटील अशोक केळकर यांनी वनपाल पाली यांना दूरध्वनी वरून माहीती दिली. त्याप्रमाणे तात्काळ परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना दरची माहिती देऊन रेस्क्यू टीम, पिंजरा व आवश्यक त्या साहित्यासह घटनास्थळी येऊन पाहणी केली.
सदरची विहीर ही आंबा कलम बागेत असून ती कच्ची कठडा असलेली आयताकृती आहे. विहिरीची लांबी सुमारे १५ फूट, रुंदी १० फूटआणि खोली २५ फूट आहे. पाण्याची पातळी 07ते 08 फुटावर असून बिबट्या हा वन्य प्राणी विहिरीमध्ये असलेल्या दगडावर पाण्यात बसलेला असल्याचे दिसून आले. त्यानंतर तात्काळ जाळीचे नेट विहिरीच्या सभोवार टाकून विहीर बंदिस्त करण्यात आली त्यानंतर पिंजऱ्याला दोऱ्या बांधून पिंजरा सुरक्षित विहिरीत सोडण्यात आला व बिबट्याला पिंजऱ्यामध्ये पंधरा मिनिटांचे आतच सुरक्षित पिंजऱ्यामध्ये घेण्यात आला



