
दापोली तालुक्यात प्रतिसाद पावसाचा फटका,साखलोळी येथे घरावर वीज पडून लागली आग
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या परतीच्या पावसाचा फटका बसत आहे काल देखील रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजा कडकडून पाऊस पडला
दापोली तालुक्यात साखळोली येथे आज 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता दोन घरांवर वीज पडून लाखोंचे नुकसान झाले आहे.
रामकृष्ण बर्वे आणि राजकुमार बर्वे यांचे घरावर तसेच त्यांच्या शेजारील चंद्रशेखर करमरकर यांच्या घरावर गुरुवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता वीज पडून करमरकर यांचे घराला अचानक आग लागली. संध्याकाळी सात वाजता मीटर जवळ वीज कोसळली आणि क्षणात मीटर आणि वायरिंग ने पेट घेतला. तसेच त्याखाली असलेली खुर्ची आणि बेड यांनी देखील पेट घेतला.
यावेळी घरातील मंडळी घराच्या अंगण्यामध्ये होती.
वीज पडली आणि आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व मंडळी घरात धावली आणि आग आटोक्यात आणली. शेजारील करमरकर यांचे घर उघडून आत जाऊन आग विझवली आहे त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशी माहिती बर्वे यांनी दिली.
दापोली तालुक्यात दोनच दिवसांपूर्वी जालगाव येथे वीज पडल्यामुळे सहा नागरिकांचे इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच आज सायंकाळी सात वाजता साखळोली येथे दोन घरांवर वीज पडून आग लागल्यामुळे परतीच्या पावसाचा मोठा फटका हा दापोलीकर वासीयांना बसल्याचे समोर आले आहे.




