
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र

काही दिवसांपूर्वी दीपावली दीपोत्सवानिमित्त संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आलं होतं. तसेच त्यावेळी त्यांच्यात दिसलेली आपुलकी चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान, आज भाऊबीजेदिवशी उद्धव आणि राज ठाकरे हे बहीण जयवंती देशपांडे यांच्या घरी एकत्र आले.
यावेळी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते.बहीण जयवंती देशपांडे यांनी यावेळी राज आणि उद्धव ठाकरे यांना औक्षण केले. तब्बल २० वर्षांनी ठाकरे बंधूंनी एकत्रित भाऊबीज केल्याने सर्वांचा आनंद द्विगुणीत झाला होता.तर उर्वशी ठाकरे यांनी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, आणि तेजस ठाकरे यांना औक्षण केले.मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर आली असल्याने त्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधुंमधील दुरावा मिटून संपूर्ण कुटुंब एक झाल्याने मुंबईतील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.




