
सावर्डेतील सह्याद्री स्कूल ऑफ आर्टसच्या विद्यार्थ्यांनी देवरूख शहरातील निसर्गसौंदर्य उतरवले कॅन्व्हासवर
सावर्डेतील सह्याद्री स्कूल ऑफ आर्टसची मान्सून सहल नुकतीच देवरूखमध्ये पार पडली. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी येथील निसर्गसौंदर्य कागदावर उमटवले आहे. त्यांनी रेखाटलेली चित्रे मनमोहक ठरत आहेत. प्रा. विक्रम परांजपे यांनी विद्यार्थ्यांना विशेष चित्रांचे प्रात्यक्षिक दाखवत रंगसंगती, रचना व निसर्गातील प्रकाशछटा कशा टिपाव्यात याचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कलानुभवासाठी पावसाळी शैक्षणिक सहलीचे दरवर्षी आयोजन केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाचा थेट साक्षात्कार घडतो आणि कलेचा मूळ गाभा अनुभवता येतो. त्यामुळे यावर्षीची सहल देवरूख परिसरातील पित्रे चित्र संग्रहालय, डीकॅड कॉलेज, पालकर फाऊंडेशन व ओली माती पॉटरी वर्गशॉप या ठिकाणी पार पडली. सहलीची सुरूवात पित्रे चित्र संग्रहालयाला भेट देवून झाली. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कोकणातील चित्रसंस्कृतीचा इतिहास पारंपारिक तैलचित्रे आणि स्थानिक कलाकारांच्या कलाकृतींचा अभ्यास केला.www.konkantoday.com




