
दिवाळीतील फटाक्यांमुळे दापोलीच्या हवेची गुणवत्ता बिघडली.
दिवाळीच्या झगमगाटात यंदा दापोलीने प्रकाशापेक्षा धुराचाच सामना केला. २० ऑक्टोबरच्या पहाटे फटाके फोडण्यात आले. यामुळे शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक १३९ वर पोहोचला. फटाक्यांमधून बाहेर पडणारे पीएम २.५ आणि पीएम १० कण, तसेच सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड यांचे मिश्रण हे केवळ विषारी नव्हे तर हळुहळू शरीरात शिरणारे जीवघेणे शस्त्र आहे. या सूक्ष्म धुलीकणांचे अस्तित्व डोळ्यांना दिसत नाही, परंतु फुफ्फुसात शिरून रक्तप्रवाहात मिसळते आणि हृदयविकार, अस्थमा, ब्रॉन्कायटिससारख्या आजारांना आमंत्रण देते.www.konkantoday.com




