
राष्ट्रीय प्रशिक्षणामुळे कोकणात विकसित आंबा छाटणी व उत्पादन व्यवस्थापन तंत्रज्ञान देशभर पोहोचणार
भारत सरकारच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान ’इंडो-इस्राईल कृती आराखड्यांतर्गत ’आंब्याचे शास्त्रीय व्यवस्थापन’ या विषयावर राष्ट्रीय प्रशिक्षण शिबीर येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या आंबा गुणवत्ता केंद्रात पार पडले. या राष्ट्रीय प्रशिक्षणामुळे कोकणात विकसित आंबा छाटणी व उत्पादन व्यवस्थापन तंत्रज्ञान देशभर पोहोचणार आहे.
शेतकर्यांनी आपल्या प्रदेशानुसार या तंत्रज्ञानात सुधारणा करुन वापरल्यास आबा उत्पादनात क्रांतिकारक वाढ होऊ शकते, असा विश्वास सर्व तज्ज्ञांनी व्यक्त केला. या तीन दिवसीय प्रशिक्षणात भारतातील आठ राज्यांतील एकूण ४० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. यामध्ये इस्त्राईलमधील तज्ज्ञांच्या सहाय्याने आधुनिकतेवर भर देत कोकणातील आंबा तंत्रज्ञानाचा देशभरात प्रसार करण्याचे ठरवण्यात आले.
www.konkantoday.com




