
संगमेश्वर तालुक्यात सर्प, विंचूदंशाच्या आकडेवारीत वाढ
संगमेश्वर तालुक्यात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. भातशेती तसेच वायंगणी शेतीच्या पेरणी, कापणीच्या वेळी गावांमध्ये शेतकर्यांना सर्प, विंचूदंश झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तीन वर्षाच्या आकडेवारीवरून सप्टेंबर महिन्यात विंचू दंश जास्त झाल्याचे आढळून येत आहे.
प्रामुख्याने कापणी, पेरणीच्या वेळी मे ते जूनच्या दरम्यान व सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक सर्पदंश झाले आहेत. यामध्ये विंचूपेक्षा सर्पदंशाचे प्रमाण सर्वाधिक आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात १५, मे ८, जून २०, जुलै १४ व ऑगस्टमध्ये १५ जणांना सर्पदंश झाला. पाच महिन्यात ७२ जणांना सर्पदंश झालेला आहे. तर त्या खालोखाल एप्रिल महिन्यात ९, मे महिन्यात १५, जून १४, जुलै महिन्यात ३, ऑगस्ट महिन्यात ८ जणांना म्हणजेच पाच महिन्यात ४९ जणांना विंचूदंश झालेला आहे. तर एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान श्वानांनी ३८ जणांना चावा घेतल्याच वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित मोरे यांनी सांगितले.www.konkantoday.com




