
केरळमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हेलिकॉप्टरल लँडिंगदरम्यान खड्ड्यात अडकल्याची घटना
* राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हेलिकॉप्टरला बुधवारी केरळमधील पठाणमथिट्टा येथे लँडिंगनंतर खड्ड्यात अडकल्याची घटना घडली. राजीव गांधी स्टेडियममध्ये झालेल्या या प्रकारानंतर घटनास्थळी तातडीने पोलिस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले आणि भारतीय हवाई दलाचे एमआय-17 हेलिकॉप्टर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
राष्ट्रपती मुर्मू शबरीमला मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात होत्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिपॅड घाईघाईने तयार करण्यात आले होते आणि काँक्रीट पूर्णपणे सुकले नव्हते. त्यामुळे हेलिकॉप्टर उतरल्यावर ते त्याचे वजन सहन करू शकले नाही आणि एका बाजूला झुकले. चाके जमिनीला स्पर्श करताच तेथे खड्डे तयार झाले.
मूळ नियोजनानुसार हेलिकॉप्टरचे लँडिंग पंबाजवळील निलक्कल येथे होणार होते, परंतु खराब हवामानामुळे ते प्रमदम येथे करण्यात आले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जखमी झाली नाही आणि राष्ट्रपती मुर्मू यांनी कोणताही विलंब न करता रस्त्याने आपला प्रवास पुढे सुरू ठेवला.




