
युवा तायक्वांदोचे सात खेळाडू राज्य तायक्वांदो स्पर्धेसाठी रवाना
रत्नागिरी : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई आयोजित रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या सहकार्याने ३५ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय ज्युनियर क्युरुगी पूमसे फ्रीस्टाइल तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२५ ही स्पर्धा चिपळूण तालुक्यातील डेरवण क्रीडा संकुल येथे २३ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर, रत्नागिरी या अधिकृत संलग्नित क्लबच्या खेळाडूंची निवड या राज्य स्पर्धेसाठी झाली असून २३ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीहून संघ रावांना होणार आहे.
संघ प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षक सौ. शशिरेखा कररा गुरुप्रसाद सावंत यांची निवड करण्यात आली आहे. राज्य स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे : भार्गवी सत्यविजय पवार, योगराज सत्यविजय पवार, अमेय भरत पाटील, सई संदेश सुवरे, दिव्या विलास गुरव, श्रुती संतोष काळे, वेदांत संतोष देसाई, रुद्र नरेंद्र नलगे.
या सर्व विजेत्या खेळाडूंना प्रमुख तज्ज्ञ प्रशिक्षक राम कररा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंना रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन व युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरतर्फे सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.




