
देवरुखात कलाकारानी रेखाटलेली भव्यदिव्य अशी दशावतारची रांगोळी लक्षवेधी ठरली
दिवाळीनिमित्त देवरुखची ग्रामदेवता श्री देवी सोळजाई मंदिरात रेखाटण्यात आलेली भव्यदिव्य अशी दशावतार रांगोळी लक्षवेधी ठरली आहे. हनुमान प्रासादिक बालमित्र समाज खालची आळी येथील रांगोळी कलाकारांनी हा वारसा बरीच वर्षे जपला आहे.सध्या महाष्ट्रात गाजत असलेला दशावतार चित्रपटातील कलाकारांनी साकारलेल्या भूमिका रांगोळीच्या माध्यमातून या मंदिरात रेखाटल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात छोटी व कमी वेळात रांगोळी साकारून विश्वविक्रम करणारा व मुंबई विद्यापीठात रांगोळीसाठी सुवर्णपदक मिळवलेला कलाकार विलास रहाटे याने या रांगोळीसाठी पुढाकार घेतला व 610 अशी दशावताराची रांगोळी रेखाटताना मंगेश नलावडे, संदीप पवार, शिवम नलावडे व सार्थक नलावडे यांनीही या रांगोळीसाठी योगदान दिले. या सर्व कलाकारांनी साकारलेली ही दशावतार रांगोळी लक्षवेधी ठरली आहे. मंदिरात येणार्या भाविकांनी कलाकारांच्या कलेला दाद दिली आहे. आठ-दहा तास खर्च करुन व 15 किलो रांगोळी वापरून दशावताराची कलाकृती या कलाकारांनी साकारली आहे. खालची आळी येथील हनुमान प्रासादिक बालमित्र मंडळाने कायमच सामाजिक बांधिलकी जपली आहे.




