
देहेण येथे बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा डम्पर ग्रामस्थांनी अडवून प्रशासनाच्या ताब्यात दिला
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश धाब्यावर बसवून आंजर्ले खाडीत मोठ्या प्रमाणात वाळूचा सक्शन पंपाच्या सहाय्याने उपसा होत असूनही स्थानिक महसूल विभाग त्याकडे कानाडोळा करत आहे. मात्र आता नागरिकांनी वाळू चोरीप्रकरणी कडक भूमिका घेतील असून काल देहेण येथे वाळूने भरलेला एक डम्पर अडवून ठेवला, महसूल विभागाला याची माहिती दिल्यावर तब्बल ३ तासांनी महसूल विभागाचे अधिकारी तेथे पोहोचले व पंचनामा करून हा वाळूने भरलेला डम्पर त्यांनी वाळूसह ताब्यात घेऊन दापोली येथील पोलीस ठाण्याच्या आवारात आणून ठेवण्यात येणार आहे.www.konkantoday.com




