
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या वाढदिवसानिमित्ताने उपनेते बाळ माने यांची सदिच्छा भेट

रत्नागिरी – कोकणातील प्रसिद्ध अध्यात्मपीठाचे अधिष्ठाता जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी मठात भेट देऊन महाराजांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी नाणीज येथील श्रीक्षेत्राचे भावी पीठाधीश कानिफनाथ महाराज उपस्थिती होते. यावेळी महाराजांनी त्यांचा सन्मान राखत बाळ माने यांचे आत्मीय स्वागत केले. दोघांमध्ये आध्यात्मिक व सामाजिक विषयांवर सखोल चर्चा झाली.

बाळ माने यांनी मठातील शांतीमय व पवित्र वातावरणात दर्शन घेतले आणि ते भावनिक व आध्यात्मिकदृष्ट्या भारावून गेले, असे त्यांनी सांगितले.
या भेटीत श्रद्धा, संस्कार आणि समाजसेवा या त्रिसूत्रीचा सुंदर संगम दिसून आला.




