
निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जातील
पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आमदार शेखर निकम यांची स्पष्टोक्ती
चिपळूण : “पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार महायुती म्हणून निवडणुका लढल्या जातील. निवडणुकीत योग्य आणि सन्मानजनक जागा वाटप केले जाईल. जागावाटप आपल्या पद्धतीने केले जाईल; परंतु निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर राहतील,” असे चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटाच्या काल (२० ऑक्टोबर) सावर्डे येथे झालेल्या बैठकीत आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी पक्षाची ताकद स्वबळावरच सिद्ध करण्याची मागणी केली, तर काहींनी युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव मांडला. यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून आमदार शेखर निकम यांनी मार्गदर्शन केले.
“प्रत्येक कार्यकर्त्याने आपणच उमेदवार आहोत, या भावनेने कामाला सुरुवात करावी. यामुळे पक्षाची ताकद दृढ होईल आणि महायुतीला निवडणुकीत यश मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीत आमदार शेखर निकम, जयंत खताते, शौकत मुकादम, दादासाहेब साळवी, नितीन ठसाळे, रमेश राणे, दिलीप माटे, संतोष सावर्डेकर, पूजा निकम, दिशा दाभोळकर, जाकीर भाई शेख, अनिलकुमार जोशी, रिया कांबळे, विजय गुजर, सूर्यकांत खेतले, समीक्षा बागवे, निलेश कदम, सचिन साडविलकर, डॉ. राकेश चाळके, समीर काझी, मिलिंद कापडी, पांडूशेठ माळी, जागृती शिंदे, शरद शिगवण, सुरेश खापले, निलेश कोलगे, बाबू साळवी, मयूर खेतले, नागेश साळवी, विकास गमरे, दिनेश साळवी, स्वप्नील शिंदे, सुरेश कुळे, विष्णू बैकर, दत्ता गुजर, निलेश खापरे, सुधीर राजेशिर्के आणि पक्षाचे बहुसंख्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




