
मच्छी वाहतूक करणारा टेम्पो पलटला; एक जण किरकोळ जखमी
गुहागर-चिपळूण महामार्गावर चिखलीदरम्यान टायर फुटल्याने गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथून रत्नागिरीच्या दिशेने मच्छी वाहतूक करणारा टेम्पो पलटी होऊन क्लीनर किरकोळ जखमी झाला आहे. गाडीचे नुकसान होऊन सर्व मच्छी ही मार्गावर पसरली होती.
टायर फुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी मार्गावर पलटी झाली. टेम्पोमधील मच्छीचे सर्व ट्रे रस्त्यावर पसरले. हा अपघात झाल्याने दोन्ही बाजूची वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. काही वेळानंतर एका बाजूने वाहतुकीसाठी मार्ग खुला करण्यात आला होता.




