स्वच्छ असलेल्या वाशिष्ठी नदीचा आता प्रदूषित नदीपट्ट्यात समावेश


राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करून नद्यांचे संवर्धन, पुनरुज्जीवन करण्याकरिता आवश्यक असलेली नियामक आणि विकासात्मक अशी दोन्ही कामे करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०२५ च्या अहवालानुसार देशात सर्वाधिक ५४ प्रदूषित नदीपट्टे असून त्यामध्य चिपळुणातून वाहणार्‍या वाशिष्ठी नदीचाही समावेश आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयाने ५४ प्रदूषित नदीपट्ट्यांसाठी टप्याटप्याने कृती आराखडा तयार केला जाणार आहे.
या प्राधिकरणाच्या माध्यमातून नियामक तसेच विकासात्मक अशा दोन्ही प्रकारच्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. प्राधिकरणासाठी आवश्यक असलेला सुमारे २ हजार कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार असून राज्य सरकारकडून १०० कोटी रुपयाचे थेट योगदान दिले जाणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button