
सडामिर्या येथे घरामध्ये पडून जखमी झालेल्या वृद्धेचा मृत्यू
रत्नागिरी शहरातील सडामिर्या येथे घरामध्ये पडून जखमी झालेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विजया अजित पारकर (६८, रा. सडामिर्या रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. विजया पारकर या राहत्या घरी बेडवरुन पडल्याने जखमी झाल्या होत्या.
त्यांना उपचारासाठी प्रथम रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय व पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालय कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले होते. २४ मार्च रोजी सायंकाळी विजया याचा मृत्यू झाला. अशी नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




