संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथे फिरण्यासाठी आलेल्या कोल्हापूरच्या तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू


संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथे मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूरच्या एका ३७ वर्षीय तरुणाचा सोनवी नदीत बुडून मृत्यू झाला. अजित शंकर बोरगे (रा. राजारामपुरी, शाहूनगर, कोल्हापूर) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित बोरगे हे रविवारी ५ एप्रिल रोजी आपल्या मित्रांसोबत टाटा सुमो गाडीने संगमेश्वरमधील लोवले येथे मित्र सागर यांच्या आजोळी फिरण्यासाठी आले होते. दुपारी ४ वाजेच्या सुमारास सर्व मित्र सोनवी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने अजित खोल पाण्यात बुडू लागले. त्यांच्या मित्रांनी, नातेवाईकांनी तातडीने शोध घेऊन त्यांना पाण्याबाहेर काढले. उपचारासाठी संगमेश्वरमधील खासगी रुग्णालयात नेले. तिथल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून उन्हाळ्याच्या दिवसात नदी किंवा तलावात पोहताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button