शैक्षणिक सहलीतून रत्नागिरी विभागालातब्बल दीड कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले.

शाळा-महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहलीसाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान रत्नागिरी विभागाच्या तब्बल 931 बसेस विविधठिकाणी धावल्या असून शैक्षणिक सहलीतून रत्नागिरी विभागाची तिजोरी भरली आहे.

तब्बल दीड कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. रत्नागिरीसह 8 आगारे मालामाल झाली आहेत. यंदाच्या शैक्षणिक सहलीसाठी शाळा, महाविद्यालयांनी लालपरीलाच पसंती दिल्याचे दिसून आले.

हिवाळा हंगामातील नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात शाळा, महाविद्यालयाच्या वतीने शैक्षणिक, ऐतिहासिक सहलीचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षापासून सहली या एसटी बसेसमधून आयोजन करा असे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना मोठा प्रतिसाद दिला. सहलीसाठी नऊ आगारातून नवीन लालपरी बसेस देण्यात आल्या होत्या. तब्ब्ल 931 एसटी बसेस हजारो-लाखो कि.मी. धावल्या असून त्यातून 1 कोटी 59 लाख 48 हजार 236 रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button