शरद पवार यांना सोडून आपण सर्वात मोठी चूक केली-ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव


उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी मुंबईत एका मुलाखतीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोडून आपण सर्वात मोठी चूक केली, अशी कबुली दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधान आले असून त्यांनी आपण अशी चूक पुन्हा करणार नाही असे म्हटले आहे. तर अडचणीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभा आहे, असे म्हटले आहे.

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर सुरू होण्याची चर्चा सुरू झाली असून आधीच शिवसेनेचे ४० आमदार फोडत एकनाथ शिंदे यांनी आपली चूल वेगळी थाटली आहे. राष्ट्रवादीचे आमदारही दिवंगत अजित पवार यांच्यासोबत पक्षातून बाहेर पडले आणि भाजपसोबत महायुतीकरून सत्ता स्थापन केली. मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ काही मोजक्यांसह भास्कर जाधव यांनी सोडली नाही.दरम्यान आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे अडचणीत आल्याची चर्चा राज्यभर होताना दिसत आहे. अशातच भास्कर जाधव यांना मुंबईत एका मुलाखतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ का सोडली नाही असा त्यांनी यामागचे कारण सांगितले. तसेच ‘शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मला खूप काही दिलं, तो पक्ष मी सोडायला नको होतं’, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली आहे.यावेळी ते म्हणाले, ‘राष्ट्रवादी मी सोडायला नको होती. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा मी पवारसाहेबांना सोडायला नको होतं. आता जो पवारसाहेबांचा पक्ष फुटला त्यावेळी मी त्यांच्यासोबत उभं राहायला पाहिजे होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून एक चूक मी आयुष्यात केली होती. त्यांनी मला खूप काही दिलं तरी मी तो पक्ष सोडला. त्यामुळे एकदा चूक झाली, पुन्हा चूक करायची नाही. हे मी ठाकपणे ठरवलं आहे. यामुळे अडचणीच्या काळामध्ये मी उद्धवसाहेबांच्या बरोबरच आहे.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button