
विहिरीत पडून वृद्धेचा मृत्यू
दापोली तालुक्यातील सोवेली चव्हाणवाडी येथे लक्ष्मी महादेव भानत (७०) हिचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना ९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
लक्ष्मी भानत या सांधेदुखीच्या त्रासाने ग्रस्त होत्या. मागील दोन दिवसांपासून त्या अस्वस्थ असल्याने घरीच विश्रांती घेत होत्या. ९ रोजी दुपारी त्या घरात कुठेही दिसत नसल्याने त्यांचे नातेवाईक रविकांत मानत यांनी शोधाशोध सुरू केली.
शोध घेत असताना विसापूर नळपाणी योजनेच्या विहिरीत त्या पाण्यात तरंगत असल्याच्या आढळून आल्या. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी हलवला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
www.konkantoday.com




