लोटे औद्योगिक वसाहतीत कचरा गोळा करताना भाजलेल्या महिलेचा मृत्यू


खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत कचरा गोळा करण्यासाठी गेलेली शकुंतला बबन सोनवणे (४८, मूळगाव पाचगणी-सांगली) ही चिपळूण, बहादूरशेखनाका, महिला कंपनीच्या कास्टिंग करून काढलेल्या गरम मातीमध्ये पाय घसरून पडल्याने गंभीर भाजल्याने कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
१२ मार्च रोजी दुपारच्या सुमारास ललिता सोनवणे व तिची सख्खी चुलत सासू शकुंतला सोनवणे या दोघी एमआयडीसीतील पुष्कर कंपनीच्या बाजूच्या आवारात कचरा गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. याचवेळी शकुंतला सोनवणे गरम मातीमध्ये घसरून पडली. यामध्ये अंगावरील कपड्याने पेट पतल्याने गंभीर भाजली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button