
लांजा तालुक्यातील आसगे -दाभोळे मार्गावर डुक्कराच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर
दुचाकीस्वाराला डुक्कराने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना लांजा तालुक्यातील आसगे-तळवडे-दाभोळे मार्गावर बेनी नदीच्या वळणाच्या ठिकाणी तीन दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेत आसगे येथील दिनकर मांडवकर (५०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लांजा तालुक्यातील आसगे येथील दिनकर मांडवकर हे गेल्या दोन वर्षांपासून ते कलिंगडाची शेती करून उत्पन्न घेतात. तीन दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास कलिंगड घेऊन ते आसगेच्या दिशेने चालले होते. त्यांच्यापुढे कलिंगड भरलेला टेम्पो होता तर ते आपल्या दुचाकीने पाठीमागून येत होते. सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आसगे रोडवर बेनी नदीच्या वळणाच्या ठिकाणी आले असता अचानकपणे समोर आलेल्या डुक्कराने त्यांच्या दुचाकीला धडक इतकी जबरदस्त होती की दिनकर मांडवकर हे दुचाकीवरून रस्त्याच्या बाजूला गटारात जाऊन पडले तर दुचाकी रस्त्यावर पडली होती.
www.konkantoday.com




