
लक्ष्मी ऑर्गनिक्सबाबतचे संभ्रम दूर करणार : कंपनी प्रॉडक्शन हेड दीपक पाटील
खेड : राज्यभरात गाजत असलेली लक्ष्मी ऑर्गनिक्स कंपनी ही केवळ पीएफएसचेच प्रॉडक्ट्स बनवत नाही तर त्यापलीकडे जाऊनही अनेक चांगले प्रॉडक्ट्स आहेत. जे ॲग्रो केमिकल्ससाठी वापरले जाते. त्यामुळे लोकांमध्ये कंपनीबाबत निर्माण झालेला संभ्रम आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. ग्रामस्थ आणि परिसरातील ग्रामपंचायतींनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचीही आम्ही उत्तर देणार असल्याची माहिती कंपनीचे प्रॉडक्शन हेड दीपक पाटील यांनी बोलताना दिली.
ते म्हणाले की, “लोटे वसाहतीमधील लक्ष्मी ऑर्गनिक्समध्ये पीएफएसचे प्रमाण हे नगण्य आहे. तसेच पीएफएस कॅटेगरीचा एक प्रॉडक्ट्स आहे. त्याचे जे सांडपाणी तयार होते. त्याच्यात अंशतः पीएफएस असते. त्या पाण्याला नष्ट करण्यासाठी एमडब्ल्यूएमएल फॅसिलिटी आहे. जी एमपीसीबीमे अप्रुव केली आहे. हे नष्ट करण्यासाठी १२०० डिग्रीपर्यंत तापमान लागते. ८०० ते १२०० मध्ये वेगवेगळे पीएफएस आहेत. १२०० पर्यंत सर्व पीएफएस जळून नष्ट होते आणि त्याच्या मूलभूत केमिकल्स मध्ये ते रूपांतरित होते.”
लक्ष्मी ऑर्गनिक्समध्ये ऍग्रो केमिकल्ससाठी लागणारे प्रॉडक्ट्स बनवले जातात. पेंट इंडस्ट्रीशी संबंधित प्रॉडक्ट्स इथे आहेत. केवळ पीएफएसचा जो एक भाग आहे. त्याच इंप्लुएन्ट इंशनरला तळोजा येथे पाठव असल्याचे त्यांनी सांगितले.
सीईटीपीमध्ये कंपनी सुरू झाल्यापासून एमपीसीबीने मान्यता दिलेलं इंप्लुएन्ट जे प्रक्रिया झालेले आहे. तेच पाठवतो मात्र अद्यापही सीईटीपी प्रशासनाने आमची पाईपलाईन सुरू केलेली नाही, ती का केली नाही, याबाबत आपला पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे जे इथे सीएईटीपीला पाठवले जाणारे केमिकल हे टँकरने पाठवावे लागत आहे.




