
राजापुरातील शेतकरी होवू लागले हायटेक, ५६०० शेतकर्यांनी घेतले महाविस्तार ऍप
शेतकर्यांच्या शेतीशी निगडित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी राज्याच्या कृषी विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित महाविस्तार हे ऍप उपलब्ध करून दिले आहे. राजापूर तालुक्यातील ५ हजार ६०० शेतकर्यांनी हे ऍप घेतल्याची माहिती तालुका कृषी विभागाकडून देण्यात आली.
हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता आणि माहितीचा अभाव यामुळे शेतकर्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. अशा स्थितीमध्ये महाविस्तार ऍप शेतकर्यांना उपयुक्त ठरत असून सध्याच्या डिजीटल युगामध्ये शेतकर्यांचे निर्णयही आता एआय महाविस्तारच्या माध्यमातून हायटेक पद्धतीने ठरू लागले आहेत.
www.konkantoday.com




