रत्नागिरी शहर कचरामुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी कंबर कसली


रत्नागिरी शहर कचरामुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने कंबर कसली आहे. शहरात भाजी, मटण आणि मासळी बाजारासह सर्वच ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर धोकादायक पातळीवर वाढल्याने नगरपरिषदेने आता ’प्लास्टिक हटाव’ मोहिमेचा बडगा उगारला आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी न. प. पथकाने ४८ ठिकाणी धाडी टाकून तब्बल २६ किलो ५०० ग्रॅम प्लास्टिक पिशव्या जप्त केल्याची माहिती नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी दिली.
शहरातील गटारे तुंबणे  कचर्‍याचे साम्राज्य वाढण्यामागे प्लास्टिक पिशव्यांचे हेच मोठे कारण असल्याचे समोर आले आहे, या पार्श्वभूमीवर न.प.ने दंडात्मक कारवाईची कडक नियमावली जाहीर केली आहे. पहिल्यांदा प्लास्टिक आढळल्यास ५ हजार, दुसर्‍यांदा आढळल्यास १० हजार, तर तिसर्‍या गुन्ह्यासाठी १५ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button