रत्नागिरी शहरालगत असलेल्या शिरगाव परिसरातील उद्यमनगर येथे  बिबट्याकडून शेळ्यांचा फडशा


रत्नागिरी शहरालगत असलेल्या शिरगाव परिसरातील उद्यमनगरमध्ये बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका घराच्या मागील गोठ्यात घुसून बिबट्याने दोन शेळ्यांची शिकार केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शिरगाव उद्यमनगर येथील रहिवासी नईम अली काळसेकर यानी आपल्या उदरनिर्वाहासाठी दुसर्‍याकडून पालन करण्यासाठी दोन शेळ्या घेतल्या होत्या. या शेळ्यांसाठी त्यांनी घराच्या पाठीमागील बाजूस गोठा बांधला होता. ३१ मार्च रोजी रात्री ३ ते ३.३० च्या सुमारास बिबट्याने या शेळ्यांवर हल्ला चढवला. मध्यरात्रीच्या शांततेत बिबट्याने दोन्ही शेळ्यांना जागीच ठार केले. अर्जदार नईम काळसेकर यांची प्रकृती अनेकदा खालावलेली असते. त्यामुळे त्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. या शेळ्यांवरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून होता. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे काळसेकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वनविभागाकडे मदतीची मागणी होत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. बिबट्या स्पष्टपणे दिसत नसला तरी त्याचा डरकाळी फोडल्यासारखा आवाज आणि शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आता सिद्ध झाले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button