रत्नागिरी शहरात ४ एप्रिलपासून ’पाईपलाईन गॅस’ नोंदणी, विशेष शिबिरांचे आयोजन


गॅस सिलिंडर वितरणावर होणारा ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी आता महानगर गॅस कंपनीच्या पाईपलाईनवर भर दिला जात आहे. रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील ज्या भागात गॅस पाईपलाईनचे जाळे विस्तारले आहे, अशा ठिकाणी नवीन कनेक्शनसाठी नोंदणी करण्यासाठी विशेष शिबिरांचे जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी आदेश दिले आहेत. ४ एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीत शहराच्या विविध भागात ही शिबीरे पार पडणार आहेत.
नोंदणी प्रक्रियेसाठी प्रभागांनुसार वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. यानुसार ४ आणि ६ एप्रिल रोजी आरोग्य मंदिर व शिवाजी नगर कर्मचारी परिसरासाठी शासकीय बॅडमिंटन वसाहत हॉल येथे शिबीर होईल ७ एप्रिल रोजी ओसवाल नगर आणि एकता मार्ग येथील नागरिकांसाठी ओसवाल नगर सोसायटी हॉलमध्ये सुविधा करण्यात आली आहे.
८ आणि ९ एप्रिलला उद्यमनगर व पडवेकर कॉलनी, राजपूरकर कॉलनी, पटवर्धनवाडी परिसरातील रहिवाशांसाठी बाळासाहेब ठाकरे हॉल पटवर्धनवाडी देवळेकर पेट्रोल पंपमागे येथे नोंदणी करता येईल. नाचणे रोड परिसरासाठी १० एप्रिल रोजी देवज्ञ भवन येथे तर हिंदू कॉलनी भागासाठी ११ एप्रिल रोजी शिवतेज हॉल, विश्वनगर मध्ये हे शिबीर होईल पुढील टप्प्यात १३ आणि स्वीकारतील १४ एप्रिल रोजी मारुती मंदिर, माळनाका, थिबापॅलेस रोड परिसरासाठी जयेश मंगल कार्यालय येथे अधिकारी उपस्थित राहतील. १५ ते १७ एप्रिल या तीन दिवसांत टिळक आळी, झाडगाव आणि सुभाष रोड, जोशी पाळंद, खालची आळी, वरची आळी, कॉंग्रेसभवन परिसरातील नागरिक वैद्य मंगल कार्यालय येथे नोंदणी करू शकतील. १८ एप्रिल रोजी कोकणनगर, क्रांतीनगर, राजनगर व नवाबनगर परिसरासाठी उर्दू शाळा, कोकणनगर येथे शिबीर आयोजित आहे. या सर्व ठिकाणी सकाळी निश्चित केलेल्या वेळेत नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांचे अर्ज स्विकारतील.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button