रत्नागिरी शहरातील थकबाकीदारांवर नगर परिषदेची कठोर कारवाई, ११० मालमत्ता ’सील’


रत्नागिरी शहरामध्ये सुमारे ३० हजारपेक्षा अधिक मालमत्ता आहेत. मार्च एण्डच्या पार्श्वमीवर थकित कर वसुलीसाठी नगरपरिषदेने कठोर पावले उचलली. करबुडव्या नागरिकांना जोरदार दणका देत अनेक मालमत्ता सील तसेच पाण्याची कनेक्शन तोडण्यात आली. ३० मार्चपर्यंत प्रशासनाच्या मालमत्ता विभागाच्या पथकाने १५ कोटी ८७ लाख ५० हजार वसुलीपैकी ११ कोटी ६२ लाख इतकी वसुली पूर्ण केली आहे. आतापर्यंत ७३.२० टक्के वसुली करण्यात नगरपरिषदेला यश आले आहे.
नगरपरिषदेच्या मालमत्ता कर वसुली पथकाने थकित ११० इमले आणि सदनिका सील केल्या. त्याचबरोबर ७० नळ जोडण्या तोडल्या. चालू आणि थकित घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी रत्नागिरी नगरपरिषदेच्या वसुली पथकांनी करवसुलीसाठी गौरदार मोहीम राबवली. एकूण १५ कोटी ८७ लाख रुपये मामणीपकी तब्बल ११ कोटी ६२ लाख रुपयांची करवसुली झाली असल्याचे वसुली विभागाचे प्रमुख मार्चपर्यंतचे है आकडे असून १ मार्च रोजी महावीर जयंती निमित्त सुट्टी असताना देखील रनप वसुली विभाग कार्यरत होता. ३१ मार्चला देखील लाखो रुपयांची वसुली करण्यात रनपच्या विभागाला यश आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button