रत्नागिरी तालुक्यातील तरवळे मायंगडेवाडी येथे भर दिवसा चोरट्याने दोन घरे फोडली, हजारोंची चोरी


रत्नागिरी तालुक्यातील तरवळे मायंगडेवाडी येथे चोरट्याने भर दिवसा दोन घरे फोडून ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली होती. ग्रामीण पोलीस ठाणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत २४ तासात चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. आदित्य देवचंद्र कांबळे (२६, रा. बालाजी अपार्टमेंट कारवांचीवाडी फाटा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या या माहितीनुसार, ५ एप्रिल दुपारी चोरट्याने विरेश प्रकाश मायंगडे (२९) व प्रज्योत रवींद्र मायंगडे (२३, दोघेही रा. तरवेळ मायंगडेवाडी, रत्नागिरी) दोघांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा कोणत्यातरी धारदार हत्याराने उचकटून आत प्रवेश केला.
घरातील लोखंडी कपाटाचे ड्रॉव्हरमधील ३३ रोख रक्कम काढून पळून जात असताना फिर्यादी यांनी सर्वेश संदेश मायंगडे यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता धक्काबुक्की करुन पलायन केले. तर फिर्यादी प्रज्योत मायंगडे यांच्या घरातून मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश करुन घरातील उघड्या कपाटात छोट्या पाकिटात ठेवलेले ५ हजार रुपये पळविले. असा ३८ हजाराच्या रोख रक्कमेवर चोरट्याने डल्ला मारला. याप्रकरणी फिर्यादी विरेश मायंगडे व प्रज्योत मायंगडे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button