रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विविध प्रलंबित समस्यांकडे दुर्लक्ष


रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विविध प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना निवेदन सादर करण्यात आले. दिव्यांगत्वाच्या दाखल्यांची वारंवार फेरतपासणी, बंद पडलेली पेन्शन आणि शासकीय योजनांमधील जाचक अटींमुळे दिव्यांग समाज संतप्त झाला असून, प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्हा रुग्णालयाकडून पूर्वी कायमस्वरूपी दाखले देण्यात आले असतानाही राज्य व केंद्र शासनाच्या प्रक्रियेमुळे (युडीआयडी कार्ड) दिव्यांगांना वारंवार तपासणीला सामोरे जॉंवे लागत आहे. आधार लिंक नसल्यामुळे काहींना ओरोख (सिंधुदुर्ग) किंवा कोल्हापूर-मुंबई येथे जावे लागत आहे. या गोंधळात पेन्शनची मुदत संपून अनेकांची पेन्शन बंद झाली आहे. गेल्या २५-३० वर्षांपासून दिव्यांप असलेल्या व्यक्तींनाही फेरतपासणीत ४० टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांग ठरवून ’सक्षम’ घोषित केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button