मुंबई गोवा महामार्गावर तळेकांटे येथे भीषण अपघात, भरधाव ट्रकने कारला धडक दिली,मंडणगड येथील प्रतिष्ठित व्यापारी दत्तात्रय केशव लेंडे गंभीर जखमी

_____

मुंबई गोवा महामार्गावर तळेकांटे येथे ट्रक चालकाच्या बेपर्वाईमुळे भीषण अपघाताची घटना घडली आहे. रत्नागिरीच्या दिशेने आपल्या मारुती सुझुकी अल्टो के टेन (क्रमांक एम.एच. ०८ ए.यु. ५१००) या कारने जाणाऱ्या मंडणगड येथील ६६ वर्षीय प्रतिष्ठित व्यापारी दत्तात्रय केशव लेंडे यांच्या गाडीला समोरून येणाऱ्या एका बेदरकार टाटा ट्रकने (क्रमांक के. ए. २२ ए. ए. २९४७) इतकी भीषण धडक दिली . लेंडे हे त्यांच्या कारने आपल्या प्रवासाला निघाले होते. तळेकांटे गावच्या हद्दीत आले असता, विरुद्ध दिशेकडून आलेल्या टाटा ट्रकने त्यांच्या कारला चालकाच्या बाजूने प्रचंड वेगात धडक दिली. हा तडाखा इतका होता की, कार रस्त्यावरून अक्षरशः उडून डायव्हर्जनच्या पलीकडे फेकली गेली. या भीषण धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून ६६ वर्षीय दत्तात्रय लेंडे हे गंभीर जखमी झाले आहेत. महामार्गावरील अशा बेजबाबदार वाहन चालवणाऱ्या चालकांमुळे निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे अशा भरदा वेगाने धावणाऱ्या वाहनावर पोलीस काय कारवाई करणाऱ्या कडे लक्ष लागले आहे
. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button