मालगुंड आरोग्य केंद्र येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेचा शुभारंभ


मालगुंड : जागतिक आरोग्य संघटना यांच्या संकल्पनेतून साजऱ्या होणाऱ्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार, डॉ. ऋषीकेश डोके तसेच आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम निवेंडकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांना आरोग्याचे महत्त्व, स्वच्छता, नियमित तपासणी, लसीकरण तसेच निरोगी जीवनशैली याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
डॉ. सुनीता पवार यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “गाव पातळीवर आरोग्यदायी सवयी रुजवूनच संपूर्ण समाज निरोगी राहू शकतो.” तर डॉ. ऋषीकेश डोके यांनी विविध आजारांचे प्रतिबंध आणि वेळेवर उपचार यांचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. परशुराम निवेंडकर यांनी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. हा कार्यक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये साहेब व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव मॅडम यांचे मार्गदर्शना खाली घेण्यात आला शेवटी औषध निर्माण अधिकारी श्री. आस्वाद यादव यांनी उपस्थितांचे आभार मानले.आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील गणपतीपुळे, नेवरे, धामणसे, कळझोडी, वरवडे अशा पाच आरोग्य उपकेंद्रात पाच स्वतंत्र कार्यक्रम घेण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button