महिलांची ‘कट्यार’ रंगणार रत्नागिरीत, सोमवारी प्रयोग


मराठी संगीत रंगभूमीवरील अजरामर नाटक ‘कट्यार काळजात घुसली’चा सर्व महिला कलाकारांचा विशेष प्रयोग १३ एप्रिलला रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात सादर होणार असून, गोव्यात इतिहास घडवलेल्या या प्रयोगाची रसिकांना उत्सुकता लागली आहे. गोव्याच्या श्री विजयादुर्गा सांस्कृतिक महिला कलाकारांनी साकारलेला हा प्रयोग रसिकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.
या प्रयोगात मुग्धा गावकर यांनी ‘सदाशिव’ची संयत व भावपूर्ण भूमिका साकारली असून, प्राची जठार यांनी ‘खाँसाहेब’ची दमदार भूमिका प्रभावीपणे उभी केली आहे. दोघींमधील जुगलबंदी हा प्रयोगाचा विशेष आकर्षणबिंदू ठरतो. हा प्रयोग रत्नागिरीतील रसिकांच्या भेटीला येत आहे. गोमंतकीय प्रतिथयश गायिका मुग्धा गावकर ‘सदाशिव’ची भूमिका अत्यंत संयत आणि भावपूर्ण पद्धतीने साकारत आहेत. खाँसाहेबांची आक्रमकता, त्यांचा दर्प आणि संगीतातील अधिकार गाजवणारी ही भूमिका प्राची जठार यांनी तितक्याच ताकदीने लिलया पेलली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button