
महाड हादरले ! अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण करणाऱ्या खासगी क्लासेस चालकावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा; आरोपी अटकेत
महाड :- *महाड शहरात गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील नामांकित 'सुनील गांधी क्लासेस'चा चालक सुनील गांधी याने एका अल्पवयीन विद्यार्थ्यांचे वर्षभर लैंगिक शोषण केल्याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात लैंगिक अपराध संरक्षण (पोक्सो) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे*.
या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालक दहावीत शिकत असताना तांबड भुवन येथील सुनील गांधी यांच्या क्लासेसमध्ये शिकवणीसाठी जात होता. 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत आरोपीने वेळोवेळी या मुलाचा लैंगिक छळ केला. सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 दरम्यान आरोपीने पीडित बालकास क्लासच्या वरच्या मजल्यावर असलेल्या आपल्या बेडरुममध्ये नेले. तिथे त्याला जबरदस्तीने बेडवर झोपवून, त्याचे कपडे काढून त्याच्यासोबत अश्लील कृत्य केले. या निंदनीय प्रकारामुळे पीडित बालक मानसिक दडपणाखाली होते, मात्र अखेर हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत.




