भाजपा स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी शहर मंडलाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन

.

भारतीय जनता पार्टी स्थापना दिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडलाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले असून. यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण जिल्हा कार्यालय विद्युत रोषणाई केली जाणार आहे. तसेच ६ एप्रिल रोजी जिल्हा कार्यालयात सत्यनारायणाची पूजा व महाप्रसाद, स. १० वाजता पक्षाचा ध्वजवंदन कार्यक्रम होऊन मिठाईवाटप केली जाणार आहे त्यानंतर स. ११ वाजता भारतीय जनता पार्टीचा इतिहास व विकास कामे तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रास बाबासाहेब परुळेकर, शिल्पाताई पटवर्धन व डॉ.ऋषिकेश केळकर संबोधित करणार आहेत. सायंकाळी ४ वाजता भजन असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे.
६ ते १० एप्रिल प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर भाजपा ध्वज फडकविला जाणार असून ९ एप्रिल रोजी सक्रिय कार्यकर्ता संमेलन व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच ७ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान सर्व प्रभागांमध्ये संपर्क अभियान राबवले जाणार असून ६ ते १२ एप्रिल याच दरम्यान लाभार्थी संपर्क संवाद आयोजित करण्यात आला आहे.
तसेच ८ एप्रिल रोजी नाचणे रोड मंगळवार आठवडा बाजार येथे स्वच्छता मोहीम व १२ एप्रिल रोजी शनिवार आठवडा बाजार येथे स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.
हे सर्व कार्यक्रम जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे , कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक राजू भाटलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या नेतृत्वात केले जाणार असून या सर्व कार्यक्रमासाठी निलेश आखाडे, सचिन गांधी, संदीप सुर्वे, सायली बेर्डे, मानसी करमरकर, नितीन जाधव, राजेंद्र फाळके, विक्रम जैन, प्रीती शिंदे, प्रथमेश घाणेकर, डॉ ऋषिकेश केळकर , दादा ढेकणे भक्ती दळी, शेखर लेले, शैलेश बेर्डे , राजेश तोडणकर, वर्षाताई ढेकणे, संतोष सावंत, समीर तिवरेकर, प्रज्ञा टाकळे आधी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button