पेणमधील मूर्तीकारांसमोर मोठे संकट, गणेशमूर्तीची परदेशवारी रखडली


गणेश मूर्तीचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पेणमधील मूर्तिकारांसमोर यंदा मोठं संकट उभे ठाकले आहे. पेणमधून दरवर्षी हजारो गणेश मूर्ती विदेशात निर्यात केल्या जातात. मात्र, यंदा आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे या मूर्तीची परदेशवारी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जेएनपीटी बंदरावर विविध मालाचे कंटेनर अडकून पडल्यामुळं गणेश मूर्ती वाहतूक करणार्‍या कंटेनर्सना जागा मिळत नाही. परिणामी, तयार झालेल्या हजारो मूर्ती गोदामातच अडकून आहेत.
पेणमधील गणेश मूर्तीची परदेशात मागणी मोठ्या प्रमाणावर असल्याने हजारो मूर्ती रवाना करण्याची कारखान्यातून धावपळ सुरू आहे. दुबई, लंडन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया, थायलंड, मॉरिशस आणि साऊथ आफ्रीका या देशांमध्ये मूर्ती पाठवण्यात येणार आहेत. मात्र, आखाती देशातील युद्धामुळे जेएनपीए बंदरात कंटेनरच्या तुटवड्यामुळे वेळेत परदेशी पाठवणीला अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, मुर्तिकारांना त्याच्या उत्पादनांची वेळेवर परदेशी पाठवणी होणार नाही, याची चिंता सतावत आहे. गणेशमूर्ती कार्यशाळांमधून शाडूमाती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती परदेशात रवाना होत आहेत, मात्र उशिरा पोहोचण्यामुळे मूर्तिकारांचा व्यवसाय प्रभावित होण्याची भीती आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button