
पेट्रोल ओतून घेणार्या मंडणगड तालुक्यातील बलदेवाडी येथील तरुणाच उपचार दरम्यान मृत्यू
मंडणगड तालुक्यातील बलदेवाडी येथे अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या तरुणाचा रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. अंकुश अनिल जाधव (३९, रा. बलदेवाडी, मंडणगड) असे मृत तरुणाचे नाव आहे. अंकुश याने नेमके कोणत्या कारणातून स्वतःला पेटवून घेतले हे अद्याप समजू शकले नाही.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी अंकुश जाधव याने गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कोणत्यातरी अज्ञात कारणातून स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. या घटनेत अंकुश हा ९० टक्के भाजून गंभीर जखमी झाला होता.
नातेवाईकांनी अंकुश माला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल केले होते. याठिकाणी अतिदक्षता विभागात अंकुश याच्यावर उपचार करण्यात येत होते. शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अंकुश याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी नोंद पोलिसात करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




