पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडून जिल्हा क्रीडा संकुलच्या कामाची पाहणी


रत्नागिरी, दि. 9 ) : मिरजोळे येथील जिल्हा क्रीडा संकुलच्या सुरु असलेल्या कामाची पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज पाहणी केली.


यावेळी अधिक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अमोल ओटवणेकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, नगरसेवक बंड्या साळवी, राजेंद्र महाडीक आदी उपस्थित होते.


बहुउद्देशील हॉल, मैदान, कार्यालयाची पाहणी केली. बहुउद्देशील हॉलमध्ये टेरा प्लेक्स तात्काळ बसवा. हॉलमधील व्हेन्टीलेशनच्या अनुषंगाने कार्यवाही करा. मैदानाच्या संरक्षित भिंतीचे काम तात्काळ सुरु करा. कार्यालयात स्वच्छता ठेवा. कार्यालयाचे रंगकाम, फर्निचर आदी कामे करुन घ्या, अशा सूचना त्यांनी यावळी केल्या.


पालकमंत्री डॉ. सामंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय व संशोधन केंद्र येथे भेट देवून पाहणी केली. तेथील सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करा, अशा सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

00

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button