
परशुराम घाटाच्या सुरक्षिततेसाठी ’व्हाया डक्ट’ पुलाचा प्रस्ताव अभ्यासक एजन्सी समितीची नेमणूक
चिपळूण मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील दरही व भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर आता घाट सुरक्षिततेसाठी दुहेरी उपाययोजना राबवण्यात येत आहेत घाटात व्हाया डक्ट पुलाचा प्रस्ताव तयार करण्यासाठी अभ्यासक एजन्सीसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. तर डोंगराला लोखंडी जाळी ठोकण्याचे काम पूर्णत्वास गेले असून सुरू असलेले गॅबियन वॉलचे कामही अतिम टण्यात आले असून पावसाळ्यापूर्वी परशुराम घाट वाहतुकीस पूर्वपदावर आणण्याचा महामार्ग विभागाचा प्रयत्न आहे.
महामार्गावरील सुमारे ५.४० लोमीटरचा परशुराम घाट हा कणातील महत्वाचा व संवेदनशील घाट म्हणून ओळखला जातो. चौपदरीकरणाच्या कामादरम्यान घाटाची तोडफोड सुरू झाल्यानंतर वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या काही अपघातांत जीवितहानीही झाली. त्यामुळे घाटातील संरक्षक मिती कायम धोक्यात राहिल्या. दरडींच्या वाढत्या घटनांमुळे केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (टीएचडीसीएल) संस्थेने घाटाचा अभ्यास करून डोंगरकड्यांना जाळी बसवणे व गॅबियन वॉल उभारणीची शिफारस केली होती. त्यानुसार कोट्यवधी रुपयांची निविदा काढून काम सुरू करण्यात आले.
www.konkantoday.com



