दुचाकी घसरून अपघात; तरुणी गंभीर

रत्नागिरी : रस्त्यावरील खडीवरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेली तरुणी गंभीर जखमी झाली. तिच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरू असून अपघाताची ही घटना ९ एप्रिल रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास संगमेश्वर-कुरधुंडा येथे घडली.
मानसी विलास घडवले (२५, रा. लाडघर दापोली) असे अपघातातील जखमी तरुणीचे नाव आहे. तिची अक्षय विजय कानसरे (३०, रा. उजगाव, संगमेश्वर) याच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीतूनच ८ एप्रिल रोजी अक्षय कानसरे आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८-एक्यू-६४०४) वर पाठीमागे मानसी घडवले हिला बसवून देवदर्शनासाठी गणपतीपुळे येथे गेला होता. देवदर्शन घेउन ते पुन्हा संगमेश्वर येथे आल्यानंतर त्यांनी तेथील लॉजवर वास्तव्य केले. त्यानंतर ९ एप्रिल रोजी दुपारी संगमेश्वर येथील बाजारपेठेत कपडे खरेदी करून सायंकाळी ४ वा.सुमारास ते पुन्हा काही ठिकाणी देवदर्शन करण्यासाठी जात असताना संगमेश्वर-कुरधुंडा येथील रस्त्यावरील खडीवरून त्यांची दुचाकी घसरून अपघात झाला.
या अपघातात मानसी रस्त्यावर खाली फेकली गेल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच दरम्यान त्या रस्त्यावरुन जाणाऱ्या एका कार चालकाने माणुसकीच्या नात्याने त्या दोघांनाही ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथे दाखल केले.
अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत दोघांचीही चौकशी केली. परंतु मानसीला गंभीर दुखापत झाल्याने तिला अधिक उपचारासांठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात रत्नागिरी शहर पोलिसांनी झिरो नंबरने दाखल करून घेतला आहे. या अपघातप्रकरणी अधिक तपास संगमेश्वर पोलिस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button