दापोली शहरात हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, ५ जणांविरुद्ध गुन्हा


दापोली शहरातील नशेमन कॉलनी भारत नगर सलमा अपार्टमेंट जवळ जोगेळे येथे हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे लग्न झाल्यापासून ९ नोव्हेंबर २०२४ ते ८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये मंजूर शकील दळवी, मुमताज शकील र. दळवी, शकील दिलावर दळवी, मेहनज वाहिद महाडिक व कमरजहॉंन शदाब मुजावर (सर्व रा. नशेमन कॉलनी, भारत नगर, सलमा अपार्टमेंट जवळ जोगेळे) यांनी हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करून क्रूर वागणूक दिली तसेच पीडित महिलेला आपल्या घरी जर काही सांगितलेस तर किंवा पळून गेलीस तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेला लग्नात मिळालेले सोन्याचे दागिने हे आरोपींनी स्वतःच्या ताब्यात ठेवून अपहार केल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. एकूण सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीचे १० तोळे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचेही फिर्यादीत नमूद आले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button