
दापोलीसह रत्नागिरी जिल्ह्यात सुट्या पैशांची टंचाई
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठा, भाजी मंडई, मासळी बाजार तसेच किराणा दुकानांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात रोखीचे व्यवहार होत असतात. मात्र सुट्या पैशांच्या अभावामुळे व्यवहार करताना वारंवार अडथळे निर्माण होत आहेत. ग्राहकांकडून १००, २०० किंवा ५०० रुपयांच्या नोटा दिल्या जात असताना परत देण्यासाठी सुटे पैसे उपलब्ध नसल्याने विक्रेत्यांना मोठा मनस्ताप सहन स्थानिक व्यापार्यांच्या माहितीनुसार दररोजच्या उलाढालीत सुमारे २० ते ३० टक्के व्यवहारांमध्ये सुट्या पैशांची समस्या निर्माण होत आहे. काही ठिकाणी ग्राहकांना उर्वरित रकमेऐवजी चॉकलेट, बिस्कीट किंवा इतर वस्तू देण्याची वेळ येत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी वाढत असून किरकोळ वादाचे प्रकारही घडत आहेत. जिल्ह्यातील बँकांमध्येही पुरेशा प्रमाणात नाणी उपलब्ध नसल्याची तक्रार व्यापार्यांकडून आहे.
www.konkantoday.com



