तायक्वाँदो अकॅडमी राजापूरच्या 8 प्रशिक्षकाचे राष्ट्रीय पंच परीक्षेत घवघवीत यश

तायक्वाँदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने तसेच तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रत्नागिरी तायक्वाँदो स्पोर्ट्स असोसिएशन, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तायक्वाँदो पंच व रिफ्रेशर परीक्षेचे आयोजन करण्यात आले.
ही परीक्षा रत्नागिरी येथील मारुती मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बॅडमिंटन हॉलमध्ये पार पडली. अखिल भारतीय स्तरावर आयोजित या परीक्षेत खेळाडूंच्या तांत्रिक, बौद्धिक तसेच शारीरिक क्षमतेची कसून चाचणी घेण्यात आली.
या परीक्षेसाठी राजापूर तालुक्यातील तायक्वाँदो अकॅडमी, राजापूर येथील प्रमुख प्रशिक्षक श्री. मुकेश शांताराम नाचरे यांच्यासह कु. श्रुतिका मांडवकर, कु. अंश गुंड्ये आणि कु. आकाश बरई यांनी राष्ट्रीय पंच रिफ्रेशर परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केली. तसेच कु. पूर्वा राऊत, कु. रिचा मांडवकर, कु. विशालाक्षी दिवटे आणि कु. वैष्णवी पाटील यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय पंच म्हणून परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे तायक्वांदो अकॅडमी राजापूर चे अध्यक्ष श्री. अभिजित जनार्दन तेली उपाध्यक्ष श्री. मुकेश मयेकर खजिनदार श्री संजय मांडवकर. सदस्य श्री दिपक धालवलकर श्री संदीप राऊत श्री. प्रसाद शिवलकर सौ. मानसी दिवटे सौ दीपिका पवार श्री अद्वैत अभ्यंकर श्री निलेश रहाटे व महिला प्रशिक्षिका मधुरा नाचरे यांनी सुद्धा सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले
तसेच तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पाठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश्वर कररा, सचिव सुभाष पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, धुलीचंद मेश्राम, तसेच सदस्य अजित गार्गे, नीरज बोरसे, सतीश खेमसकर, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, आणि तायक्वाँदो अकॅडमी, राजापूर परिवार यांनी विशेष अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button