डिझेल दरवाढीचा मच्छीमारी वर मोठा परिणाम , हर्णे बंदरात नौका उभ्या

आखाती देशातील युद्धामुळे डिझेलचे दर प्रति लिटर 144 रुपयांवर पोहोचल्याने याचा फटका कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांना बसला आहे. दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात डिझेल दरवाढीमुळे मच्छीमारांना नौका बंदरात नांगर टाकून उभ्या करण्याची वेळ आली आहे. एकीकडे डिझेल डिझेलची दरवाढ आणि दुसरीकडे हॉटेल व्यवसायातील मंदीमुळे मासळीला योग्य दर मिळत नाही, त्यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे.
आखाती भागात सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे संकट निर्माण झाले आहे याचा थेट परिणाम कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारी व्यवसायावर झाल्या असून औद्योगिक डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने मच्छीमार सहकारी संस्था आणि मच्छीमार मोठ्या संकटात सापडले आहेत.
मच्छीमार सहकारी संस्थांना तेल कंपन्यांकडून मिळणाऱ्या डिझेलच्या दरात मोठी तफावत निर्माण झाली आहे यापूर्वी प्रति लिटर 95 रुपयांवरून 115 रुपये अशी वाढ झाल्यानंतर आता थेट १४४ रुपयांपर्यंत दर वाढवण्यात आले आहेत. या दर वाढीमुळे नौका चालवणे आता मच्छीमारांच्या अवाक्या बाहेर गेले आहे.
त्यामुळे दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात मच्छीमारांनी आपल्या नौका उभ्या करून ठेवल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button