छातीतील फुफ्फुसाच्या गाठीवर वालावलकर रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

चिपळूण : माळनाका (ता. रत्नागिरी) येथील ५५ वर्षीय महिलेच्या फुफ्फुसात असलेल्या गाठीवर येथील वालावलकर रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
गेली कित्येक दिवस ही महिला छातीत दुखत असल्याने त्रस्त होती. तिला चालताना तसेच अतिश्रमाचे काम करताना देखील दुखत होते. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने अनेक ठिकाणी काढलेला इसीजी मात्र निर्दोष होता. हृदयरोग नाही हे सिद्ध झाले. त्यानंतर ही महिला रुग्ण वालावलकर रुग्णालयात तपासणीसाठी आली तिचा एक्स-रे केला गेला आणि त्यात एक मोठी गाठ डाव्या फुफ्फुसात सापडली. ही गाठ तीच्या श्वास नलिकेवर दाब देत होती.
वालावलकर रुग्णालयातील डॉक्टरनी सीटी स्कॅन करून नंतर बायोप्सीद्वारे गाठीचा तुकडा काढून ती गाठ तपासून ती गाठ कॅन्सरची नसल्याचे सांगितले. पण ही गाठ काढण्यासाठी फुफ्फुसाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते.

सीव्हीटीएस विभागाचे डॉ. राजीव गोडबोले यांनी ही जोखमीचे व अतिशय क्लिष्ट अशी ही शस्त्रक्रिया नुकतीच वालावलकर रुग्णालयात पार पडली. किमान ४ ते ५ तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. यामध्ये ७०० ते ८०० ग्रॅम वजनाचा मांसाचा गोळा फुफ्फुसातून काढण्यात डॉ. राजीव गोडबोले यांना यश आले. ही शस्त्रक्रिया संपूर्णपणे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत विनामूल्य करण्यात आली आणि रुग्णाला जीवनदान मिळाले.
या क्लिष्ट शस्त्रक्रियेला आवश्यक उपकरणे, सीव्हीटीएस मॉड्युलर, ऑपरेशन थिएटर, हार्ट लंग मशीन आणि विशेष म्हणजे तज्ञ वैद्यकीय तज्ञ आणि कुशल भूलतज्ञ आणि शासकीय योजनेचे आर्थिक पाठबळ मिळाल्याने त्या महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयाचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button