चिपळूण शहरात होणार्‍या ७२ किमी भुयारी गटार योजनेबाबत विशेष बैठक संपन्न


चिपळूण शहरातील उघड्या गटारांमुळे निर्माण होणारी दुर्गंधी व सांडपाण्याची समस्या दूर करण्यासाठी चिपळूण नगर परिषद हद्दीत ७२ किलोमीटर लांबीची भुयारी गटार योजना राबविण्याबाबत काल मंगळवार दि. ७ एप्रिल रोजी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र (तालीम हॉल) येथे झालेल्या या बैठकीत नगरसेवक तसेच नगरपरिषद अधिकारी, कर्मचार्‍यांना योजनेचे पीपीटी सादरीकरणाद्वारे आणि प्रत्यक्ष कृती आराखड्याद्वारे सविस्तर आढावा देण्यात आला.
या बैठकीस नगराध्यक्ष उमेश सकपाळ आणि मुख्याधिकारी संजय जाधव प्रमुख उपस्थित होते. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम पाहात असलेल्या मे. संदीप गुरव ऍण्ड असोसिएटस, वाई (सातारा) यांनी योजनेचा प्रकल्प अहवाल, तांत्रिक बाबी तसेच प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रक्रिया यावेळी समजावून सांगितली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button